आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diana Hayden Walks Down The Aisle With Collin Dick In Las Vegas

डिकबरोबरच्या भेटीनंतर महिनाभरातच लग्नगाठीत अडकली माजी मिस वर्ल्ड डायना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मिस वर्ल्ड डायना हेडेन आता डायना हेडेन डिक झाली आहे. ब्युटी क्वीन डायना कॉलिन डिकबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. आता हे दोघे रेशीमगाठीत अडकले आहेत. दोघांनी 13 सप्टेंबर रोजी लास वेगासमध्ये लग्न केले आणि आता हे दोघे हनीमुनसाठी इटलीला गेले आहेत.

डायनाचा वेडिंग गाऊन अर्चना कोचरने डिझाईन केला होता. या वेडिंग गाऊनमध्ये डायना खूपच स्टनिंग दिसत होती. नववधूच्या रुपात तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसले.

डायनचा पती कॉलिन मुळचा लास वेगासचा असून सध्या मुंबईत वास्तव्याला आहे. कॉलिन आंतरराष्ट्रीय एनजीओच्या पब्लिक हेल्थ संबंधी असायमेंटवर काम करत आहे.

रंजक गोष्ट म्हणजे डायना आणि कॉलिनची भेट महिन्याभरापूर्वीच झाली होती. भेटीच्या महिन्याभरातच हे दोघे विवाहबद्ध झाले.

डायनाच्या निकटवर्तीयांनी सांगितले, की ''डायनाला पूर्वीपासूनच भव्य लग्न करण्याची इच्छा होती. तिने स्वप्नात बघितल्याप्रमाणेच तिचे लग्न झाले.''

पुढील स्लाईड्समध्ये बघा डायना आणि कॉलिनच्या लग्नाची खास छायाचित्रे...