आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Difficult Word Not In My Dictionary Madhuri Dixit

अवघड हा शब्दच शब्दकोशात नाही - माधुरी दीक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माझ्या शब्दकोशात अवघड असा शब्दच नाही. उलट माझ्यासमोर आलेल्या समस्या सोडवायला आवडत असल्याचे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने एका मुलाखतीत सांगितले आहे.‘डेढ इश्किया’द्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन केल्यानंतर माधुरीचा ‘गुलाब गँग’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटातील सर्व स्टंट माधुरीने स्वत:च केले आहेत. बुंदेलखंड येथील अन्यायाविरुद्ध लढणा-या महिलांच्या एका गटाच्या सत्यकथेवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात अ‍ॅक्शन सीन करणे अवघड होते का, असे विचारल्यावर माधुरी म्हणाली, तायक्वांदोचे प्रशिक्षण घेतल्याने अशा सीन्ससाठी खूप मदत झाली.
या चित्रपटाद्वारे प्रथमच माधुरी आणि जुही चावला एकत्र दिसणार आहेत. याआधीही त्यांना एका चित्रपटात एकत्र काम करण्याची ऑफर होती. पण त्या वेळी जुहीने नकार दिला होता. जुही चावला या चित्रपटात प्रथमच खलनायिकेची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
पुढे वाचा, माधुरी म्हणते स्त्रीने साक्षर होणे गरजेचे