आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आग-यात फुलले दिलीप कुमार-अस्माचे प्रेम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चित्रपटसृष्टीची जिवंत दंतकथा म्हणून ख्याती असलेल्या दिलीपकुमार यांचे अधिकृत आत्मचरित्र येत्या 11 डिसेंबरला प्रकाशित होणार आहे. 11 डिसेंबर 2012 हा दिलीपकुमार यांचा नव्वदावा वाढदिवस आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने ट्रॅजेडी किंगच्या आयुष्यातील ब-याचशा गोष्टी जाणून घेण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. दिलीप कुमार यांच्या पेशावरपासून मुंबईपर्यंतच्या जीवनप्रवासातील मित्र आणि सह अभिनेत्रींसोबतचे रंजक किस्से त्यांच्याच शब्दांत मांडणयात आले आहेत. पाकिस्तानी मैत्रीण हसीना अस्मासोबतच्या जवळीकीचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे. सायरा बानोची मैत्रीण ज्येष्ठ चित्रपट लेखिका उदय तारा नायर यांच्या मदतीने दिलीपकुमार यांनी आत्मचरित्राला अंतिम रुप दिले आहे.
आतापर्यंत तीन पुस्तके : दिलीप कुमार यांच्यावर आत्तापर्यंत विनीता लांबा, संजीत नावरेकर आणि लॉर्ड मेघनाद देसाई यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र तारा नायर यांनी लिहिलेले दिलीप कुमार यांचे हे पहिले अधिकृत आत्मचरित्र असेल. 2013 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत तर दिलीप कुमार यांच्या चित्रपट कारकीर्दीला 68 वर्षे. या निमित्ताने प्रकाशित होणारे हे इंग्रजी आत्मचरित्र सुमारे 600 पानांचे असून ते कॉफी टेबल बुकच्या आकाराचे असेल. पुस्तकात दिलीप कुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांची काही एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे असतील. पुस्तकाची हिंदी आणि उर्दू आवृत्ती पेपरबॅक स्वरूपात येईल. ही आवृ्तती स्वस्त किंमतीत उपलब्ध होईल.
अशी दिली परवानगी: सुरूवातीला दिलीप कुमार यांची आत्मचरित्र प्रसिद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. ते म्हणत की त्यांचे आयुष्य एवढे काही महत्त्वाचे नव्हते की, लोक ते आवडीने वाचतील. मात्र एका दिवंगत चित्रपट समीक्षक-लेखकाने एका पुस्तकात त्यांच्याविषयी केलेल्या काही उल्लेखामुळे ते नाराज होते. याच चुकीच्या गोष्टी इतिहासात नमूद होऊ नयेत, यासाठी हे आत्मचरित्र लिहिण्याचे त्यांनी ठरवले.

डॉक्युमेंट्रीदेखील रिलीज होणार : दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रासोबत त्यांच्या आयुष्यावर आधारित एक डॉक्युमेंट्रीदेखील प्रदर्शित केली जाणार आहे. त्यांच्या बंगल्यात लावलेला एक कॅमेरा सर्व रेकॉर्डिंग करत असतो. ही डीव्हीडी स्वस्तात उपलब्ध करून दिली जाईल.