आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : दिलीप साहेबांना मिळाली रुग्णालयातून सुटी, व्हिलचेअरवर आले समोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना दहा दिवसांनी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर 26 सप्टेंबरच्या संध्याकाळी दिलीप साहेब मुंबईतील लीलावती रुग्णालयातून घरी परतले.

15 सप्टेंबर रोजी हृद्यविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दहा दिवस डॉक्टांराच्या निगरानीखाली राहिल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी पाठवण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला.

दिलीप साहेबांच्या चाहत्यांना ही बातमी समजताच मोठ्या संख्येते ते रुग्णालयाबाहेर जमले होते. व्हिलचेअरवर दिलीप साहेब रुग्णालयाबाहेर पडताच त्यांचे चाहते त्यांना भेटण्यास आतुर झाले होते.

दिलीप साहेबांनी हात हलवून त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत होत्या.
बघा दिलीप साहेबांची रुग्णालयाबाहेर क्लिक करण्यात आलेली ही छायाचित्रे...