आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Kumar Haux Death Rumours Shocked Bollywood

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ठणठणीत, निधनाचे वृत्त खोटे, तुम्ही स्वतः बघा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या रविवारी (15 सप्टेंबर) त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. तेव्हापासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
एकीकडे दिलीप साहेबांचे चाहते त्यांच्या प्रकृती स्वस्थासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या निधनाच्या अफवा पसरु लागल्या. सोशल नेटवर्किंग साईट्सवर बुधवारी त्यांच्या निधनाची अफवा पसरली. ही अफवा खरी समजून दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिलीप साहेबांना श्रद्धांजली वाहिली.
अनुरागच्या ट्विटमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. नंतर अनुरागने याबाबत क्षमासुद्धा मागितली.
सोशल नेटवर्किंग साईट्सवर पसरलेल्या अफवांनंतर दिलीप कुमार यांचे रुग्णालयातील एक छायाचित्र समोर आले आहे. या छायाचित्रात त्यांची तब्येत चांगली ठिक दिसत आहे.