आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 YEARS : ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ आजही नंबर वन !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - मोठ्या पडद्यावरील हळुवार प्रेमकथांनी आजवर अनेक विक्रम केले आहेत. मात्र, 1995 मध्ये आलेल्या शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ने (डीडीएलजे) नवा विक्रम केला आहे. अठरा वर्षांनंतरही ही प्रेमकहाणी अजूनही ‘हिट’ आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणात डीडीएलजेने बाजी मारली आहे. या देशातील सर्वांत मोठी ‘पे पर व्ह्यू’ कंपनीने हे सर्वेक्षण केले.


हिंदी चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हे ऑनलाइन व्होटिंग घेण्यात आले. बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? असा प्रश्न रसिकांना विचारण्यात आला होता. यात सर्वाधिक 47 टक्के मतदान 'डीडीएलजे'ला झाले. 1951 मध्ये प्रदर्शित झालेला राज कपूर यांचा ‘आवारा’, 1957 मध्ये आलेला महबूब खान यांचा ‘मदर इंडिया’ आणि 1975 मध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला रमेश सिप्पी यांचा ‘शोले’ या चित्रपटांना डीडीएलजेने मागे टाकले.


हळुवार प्रेमकथा...
हृदयस्पर्शी चित्रपटांसाठी प्रसिद्ध दिवंगत निर्माते यश चोप्रा यांची ‘डीडीएलजे’ ही निर्मिती होती. आदित्य चोप्रा यांचे दिग्दर्शन असलेला हा पहिलाच चित्रपट. या कथानकाबद्दल यश चोप्रा म्हणाले होते की, हीरो प्रेमिकेला पळवून नेत नाही. उलट तिच्या कुटुंबीयांचे मतपरिवर्तन करूनच आपलेसे करतो. म्हणूनच प्रेक्षकांना हा चित्रपट अधिक आवडला.