आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dimple Kapadia Remembers First Meeting With Rajesh Khanna

डिंपल यांनी उघड केले राजेश खन्ना यांच्या पहिल्या भेटीचे रहस्य, \'बॉबी\'च्या शुटिंगवेळी होत्या प्रेग्नेंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत अभिनेता राजेश खन्ना हे एकेकाळी तरूणींच्या हृदयाच्या ठोके होते. तरूणी त्यांच्या अदांवर फिदा होत होत्या. अशावेळी 'बॉबी गर्ल' डिंपल कपाडियासुध्दा त्यांच्यापासून दुर राहू शकल्या नाहीत. त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले, की त्यांना राजेश खन्ना यांची पहिली भेट आजही आठवली तर वाटते, की त्या कालच त्यांना भेटल्या होत्या. त्या पुढे म्हणतात, 'माझे वडील खूप कलाप्रेमी होते. कोणत्याही निमित्तावर पार्टीत ठेवत आणि कलाकारांना बोलवत होते. त्यांचे सतत कलाकारांसोबत उठणे-बसणे होते. फिल्म इंडस्ट्रीचे अनेक स्टार्स त्यांचे मित्र होते. त्यांचे सर्वांसोबतच चांगले संबंध होते. त्यांच्या पार्टीत बॉलिवूडचे दिग्दज स्टार्स उपस्थित राहत होते.
अशाच एका पार्टी राजेश खन्ना यांनी हजेरी लावली होती. त्यांनी मला दुरूनच बघितले आणि त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या त्यांच्या मित्रांना म्हणाले ही सुंदर तरूणी सिनेमांत आली तर एक दिवस खूप मोठी स्टार्स होईल.' त्या मित्राने मला बोलावले आणि राजेश खन्ना यांची मला भेट घालून दिली. मी त्यांची खूप मोठी चाहती होते. परंतु त्यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर मी त्यांची दीवानी झाले. तेव्हा मी फक्त 15 वर्षांची होते आणि 'बॉबी' सिनेमासाठी मी निवडले गेले.
पहिल्या भेटीची जादू माझ्यावर तशीच होती तोच, योगा-योगाने माझी आणि त्यांची दुसरी भेट झाली. अहमदाबाद येथे खूप मोठा कार्यक्रम होते. ज्यासाठी मुंबई चार्टर्ड फ्लाइट केले होते. त्या फ्लाइटमध्ये राजेश यांच्यासोबत माझी दुसरी भेट घडून आली. यावेळी मी त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. आमच्यात गप्पांची सुरूवात काही अशाप्रकारे सुरू झाली:
मी: फंक्शनमध्ये खूप गर्दी असेल ना, तुम्ही माझा हात पकडून चालाल का?
राजेशजी: तुझी इच्छा आहे, तर नक्कीच.
मी: सर्वांसमोर?
राजेशजी: हो, सर्वांसमोर.
मी: मग नंतर सोडणार तर नाही?
राजेशजी: कधीच नाही
मी माझ्या अदांनी आणि नख-यांनी त्यांना भूरळ घालत होते आणि ते माझ्या अदांमध्ये फसत जात होते. ते काही दिवसांनी माझ्या वडीलांकडे माझा हात मागत म्हणाले, 'मला सात दिवसांच्या आत लग्न करायचे आहे.' तेव्हा 'बॉबी'ची शुटिंग सुरू झाली होती. आमचा लगेच साखरपुडा आणि तातडीने लग्न झाले. परंतु ही गोष्ट जगापासून गुपित राहिली. 'बॉबी'ची शुटिंग पूर्ण होत असतानाच मी गर्भवती होते.
पुढे वाचा आणखी काय म्हणाल्या डिंपल कपाडिया?