आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Bharti: A Film On Divya's Life And Mysterious Death

दिव्या भारतीच्या रहस्यमय मृत्यूवर बनणार चित्रपट, उलगडणार सत्य !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्वदच्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री दिव्या भारतीच्या जीवनावर चित्रपट तयार केला जाणार आहे. असे मानले जात आहे की, 'लव बिहाइंड द बॉर्डर'ची कथा दिव्याच्या जीवनाची कथा आहे. या चित्रपटाच्या मुख्य नायिकेचे कास्टिंग अजून झालेले नाही.
दिव्याची जवळची राहिलेली मैत्रीण डिजायनर नीता लुलाच्या भूमिकेसाठी एका ग्रीक अभिनेत्रीला घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. चित्रपट निर्मात्याचे म्हणणे आहे की, तातियाना सापिकीदू नावाची अभिनेत्री नीताच्या भूमिकेसाठी एकदम योग्य आहे. एका सूत्राने सांगितलेल्या माहितीनुसार, दिव्याच्या शेवटच्या काळात नीता आणि तिचा पती साजिद नाडियादवाला हे तिच्यासोबत होते. अभिनेता विजी भाटिया साजीदची भूमिका करणार आहेत.
'शोला और शबनम', 'दिवाना', आणि 'दिल आशना है' अशा चित्रपटांमध्ये दिव्याने केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहे. ५ एप्रिल १९९३मध्ये ५व्या मजल्यावरुन पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. मात्र दिव्याने आत्महत्या केली होती, की तिची हत्या झाली होती, हे अद्यापही उघड झालेले नाही.