आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don Ravi Pujari Sets B Wood Abuzz With Threat Calls To Top Filmstars

स्टार्सना येत आहेत अंडरवर्ल्ड ड़ॉन रवि पुजारीचे कॉल्स, सलमानलाही धमकीचा फोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय सिनेमासृष्टीच्या बॉलिवूडशी जोडलेल्या लोकांना किंवा ज्यांना बॉलिवूडविषयी जाणून घेण्याची उत्सूकता आहे अशा लोकांना आठवत असेल जेव्हा अंडरवर्ल्ड डॉन स्टार्सकडून पैसे वसूल करत होता. त्यावेळी बॉलिवूडमध्ये बरीच खळबळ उडाली होती. या डॉनने बॉलिवूड स्टार्स, संगीतकार आणि सिनेमा निर्मात्यांना धमकी देऊन खूप पैसा वसूल केला होता.
काल (22 फेब्रुवारी) पुन्हा एकदा अशी घटना समोर आली आहे. सांगितले जाते, की मागील काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रीच्या दोन मोठ्या अभिनेत्यांना आणि दोन सिनेमा निर्मात्यांना फोन करून पैशांची मागणी केली. हे फोन अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीने केले आहेत आणि तो पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये एक गुन्हेगार आहे.
तुम्हाला ऐकून धक्का बसेल, की या दोन अभिनेत्यांमध्ये एक सलमान खान आहे, ज्याला या डॉनचा फोन आला आहे.
सलमानला मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात धमकीचे फोनदेखील आले होते. दुसरा अभिनेता फरहान अख्तर आहे, त्यालाही या डॉनचे फोन आले आहेत. याव्यतिरिक्त आम्ही ज्या दोन सिनेमा निर्मात्यांविषयी सांगत आहोत, त्यामध्ये फरहान आजमी आणि रीतेश सिधवानी यांचा सामावेश आहे. या सर्वांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात फोन करून पैसे देण्याची मागणी केली आहे. सांगितले जात आहे, की हे फोन कॉल्स त्यांना ईरानीवरून आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या घटनेविषयी अधिक माहिती...