आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Shriram Nene Is Responsible For Madhuri's Flop Comeback

पती डॉ. श्रीराम नेनेंमुळे माधुरीचे करिअर अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेकट्ररी रिक्कू राकेशनाथ सोबत नसल्यामुळे आणि पती डॉ. श्रीराम नेने यांच्या चुकीच्या निर्णयामुळे माधुरी दीक्षितच्या पुनरागमनानंतरचे करियर धोक्यात असल्याची चर्चा आहे.
माधुरी दीक्षितचा ‘डेढ इश्किया’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. एवढेच नव्हे, तर ‘यारियां’ने बेगम पाराला मागे टाकले. त्यामुळे तिच्या कमबॅकविषयी भलतीच चर्चा होत आहे. खरं तर, माधुरीच्या 28 वर्षांच्या करिअरचे यश तिचे सेकेट्ररी रिक्कू राकेशनाथ यांनाही जाते. ते खूप अनुभवी व्यक्ती आहेत. त्या काळात सुभाष घई, बोनी कपूर आणि एन. चंद्रांसारख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटाने माधुरीला यश मिळवून दिले. लग्नानंतर माधुरीने चित्रपटांतून ब्रेक घेतला. त्याच्या काही वर्षांनंतर पुनरागमन केल्यावर रिक्कू यांनी माधुरीसाठी यशराज बॅनरचा ‘आजा नच ले’ (2007) निवडला, मात्र तो फ्लॉप ठरला. पण तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. नंतर तिने काही जाहिरातींत काम केले. त्यानंतर तिला ‘झलक दिखला जा’सारखा रिअँलिटी शो मिळाला. त्या वेळी ती विदेशातून मुंबईला ये-जा करत शूटिंग करत होती. त्याच्या काही दिवसांनंतर ती कुटुंबासोबत मायदेशी परतली. मात्र, आल्यानंतर तिने आपल्या करिअरविषयी निर्णय घेण्याची जबाबदारी रिक्कूकडून काढून घेतली.
पुढे वाचा, डॉ. नेनेंच्या चुकीच्या निर्णयामुळे माधुरीचे पुनरागमन ठरले फ्लॉप...