आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : \'दुनियादारी\'ला हाऊसफूलचे बोर्ड, तरुणाईसह सगळ्यांनाच लावले वेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेसृष्टीत दर्जेदार कलाकृती तयार होत नाहीत, मराठी सिनेमा तरुणाईला आपल्याकडे वळवण्यात अपयशी ठरतो, मराठी प्रेक्षकच मराठी सिनेमांकडे पाठ फिरवतात अशी खंत नेहमीच व्यक्त केली जात होती. मात्र 'दुनियादारी' सिनेमाने ही प्रतिमा पुसून काढली आहे. सत्तरच्या दशकात तरुणाईच्या मनावर आपला खास ठसा उमटवणा-या सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. रिलीजपासूनच या सिनेमाला हाऊसफूलचे बोर्ड लागले आहेत. रिलीजच्या केवळ तीन दिवसांतच या सिनेमाने तिकिट बारीवर सव्वा कोटींवर व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवशी दिवसाला 140 शोजने शुभारंभ झालेल्या या सिनेमाने आता दोनशेच्या वर शोजपर्यंतचा आकडा गाठला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबादसह हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी गर्दी खेचत आहे.

काळ बदलला, पिढ्या बदलल्या, तरी तरुणाईची दुनियादारी तीच आहे. आपल्या मैत्रीसाठी जीवाचं रान करणारे जिगरी दोस्त... कट्यावरची धमाल, टपरीवरची कटींग, कॉलेजमधले मंतरलेले दिवस आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यावरही कालातीत टिकून राहिलेली मैत्री.. या सगळ्याचा जिवंत अनुभव घेऊन अवतरलेली ही सदाबहार दुनियादारी प्रेक्षकांनी आपली केली. प्रत्येक पिढीतील तरुणांना वेड लावणारी ही दुनियादारी त्याच दशकातील लुकसह, रेट्रो स्टाईलमध्ये रुपेरी पडद्यावर अवतरली. त्यामुळे तरुणांनीच नव्हे तर सर्व वयोगटातल्या तमाम रसिकांनी या सिनेमाला आपली खास पसंती दर्शवली आहे.

झी टॉकीजची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची नोंद 'टॉप 10 मुव्हीज इन इंडिया इन करंट वीक'च्या यादीत झाली आहे. या यादीत हा सिनेमा पहिल्या स्थानावर आहे.

शिवाय 'दे धक्का', 'नटरंग', 'काकस्पर्श'नंतर पहिल्याच आठवड्यात विक्रमी व्यवसाय करणा-या सिनेमांमध्ये 'दुनियादारी'ची भर पडली असून झी टॉकीजने यशाचा आणखी एक विक्रम रचला आहे.

सिनेरसिकांच्या मिळत असलेल्या तुडुंब प्रतिसादामुळे सिनेमातील कलाकारमंडळीही खूप आनंदात आहे. या यशाबद्दल काय म्हणतायेत सिनेमातील कलाकार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...