आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टोटल सियाप्पा' सिनेमामधून दिग्दर्शक ई. निवास यांचे पुनरागमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1999 मध्ये 'शूल'सारख्या यशस्वी सिनेमाचे दिग्दर्शन केल्यानंतर ई. निवास आता सहा वर्षांनंतर 'टोटल सियाप्पा' सिनेमाद्वारे सिनेमासृष्टीत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे पुनरागमन नव्याने प्रवेश घेतल्यासारखे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केवळ 23 वर्षांच्या एका दिग्दर्शकाच्या खात्यात सर्वाधिक यशस्वी सिनेमा असेल आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी स्वत: अमिताभ बच्चन यांनी त्याला फोन केला असेल तर तो दिग्दर्शक आकाशात उडाल्याशिवाय राहणार नाही.
माझ्या बाबतीतही असेच घडले असल्याचे ई. निवास सांगतो. तो म्हणतो की, 'शूल' जेवढा यशस्वी ठरला तेवढेच ('लव्ह के लिए कुछ भी करेगा', 'दम', 'बर्दाश्त,', 'माय नेम इज अँथनी गोन्साल्विस', 'दे ताली') त्यानंतर आलेले सिनेमे अपयशी ठरले. त्यामुळे मी आत्मपरीक्षण करण्यासाठी काही दिवसांचा ब्रेक घेत कुटुंबासोबत अनेक दिवस आकलन करण्यात घालवले. या काळात मी आत्मपरीक्षण करण्याबरोबरच काही जाहिराती तयार केल्या.' ई. निवास आता 'टोटल सियाप्पा' सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये आपल्या नवीन कारकीर्दीला सुरुवात करत आहे. या सिनेमाचा निर्माता 'अ वेनसडे' आणि 'स्पेशल 26' सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक नीरज पांडे करत असून सिनेमाची कथादेखील त्याचीच आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा ई. निवास सिनेमाविषयी काय बोलला...?