आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ek Tha Tiger Box Office Houseful Moviegoers Call It A Big Hit

'एक था टायगर' : बॉक्स ऑफिस फुल, प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'एक था टायगर' स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहाण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर लांबचलांब रांगा लागल्या. पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर 'एक था टायगर'ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३० कोटींचा व्यवसाय केला आहे. प्रेक्षकांनीही चित्रपट आवडल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या पाच दिवसात हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ट्विटरवर सलमान खान आणि 'एक था टायगर' १५ ऑगस्ट रोजी ट्रेंडमध्ये होता. एवढेच नाही तर फिल्म गुगल ट्रेँड्समध्ये चित्रपटाचा समावेश झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक दर्शकांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवली आहेत.
विशेष म्हणजे हा चित्रपट हाऊसफूल असल्यामुळे सलमानच्या ब-याच चाहत्यांना हा चित्रपट बघण्यासा ठी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागत आहे. तब्बल चार वर्षांनी सलमान खान आणि कतरिना कैफ या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसले. २००८ साली 'युवराज' चित्रपटात हे दोघे एकत्र झळकले होते. 'एक था टायगर'सोबत शाहरुखचाही चित्रपट विकत घ्यावा लागेल; सलमान नाराज
'एक था टायगर' बघण्यासाठी प्रेक्षकांना मोजावे लागणार जास्त पैसे