आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिसवर 'टायगर'ची डरकाळी, पहिल्या आठवड्यात करणार २०० कोटींची कमाई !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त, पडद्यावर सलमान-कॅटरिनाची 'केमिस्ट्री', त्याला यशराज बॅनरचा साज आणि भारत-पाकिस्तान संबंधावर आधारित कथा. या सर्व बाबी 'एक था टायगर'मध्ये एकत्र आल्या. त्यानंतर 'एक था टायगर'वर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या नसत्या तरच नवल! 'एक था टायगर'ने पहिल्याच दिवशी तिकीटबारीवर 33 ते 35 कोटींचा गल्ला जमवला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील हा एक विक्रम आहे. एकाच दिवशी एवढी कमाई करणारा एक था टायगर हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

बॉलीवूडमधील ट्रेड अँनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, आता सर्व ठिकाणांहून आकडे एकत्र करण्यात येत आहेत. हा आकडा 33 ते 35 कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. दुसरे विश्लेषक कोमल नाहटा यांनी ट्विटरवर ट्विट केल्यानुसार एक था टायगरने पहिल्याच दिवशी 33 ते 35 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची अधिकृत माहिती आहे. तरण आदर्श यांनी सांगितले की, 'एक था टायगर' बुधवारी अमेरिकेतील 90 ठिकाणी रिलीज करण्यात आला. त्यातून 1,58,000 डॉलर्सचे (सुमारे 87 लाख 88 हजार रुपये) कलेक्शन झाले आहे.
आणखी 30 ठिकाणांहून आकड्यांची प्रतीक्षा आहे. ब्रिटनमध्ये 'एक था टायगर'ने 1,75,000 डॉलरची कमाई केली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. ईद आणखी तीन ते चार दिवसांनी आहे. त्या वेळी 'एक था टायगर' मोठय़ा प्रमाणात गर्दी खेचण्याची शक्यता आहे. पहिल्याच आठवड्यात 200 कोटींची कमाई करणारा 'एक था टायगर' हा पहिलाच चित्रपट ठरेल.
पैसा वसूल...'एक था टायगर'
'एक था टायगर'ची पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक ३० कोटींची कमाई
'एक था टायगर'सोबत शाहरुखचाही चित्रपट विकत घ्यावा लागेल