आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखावर आधारित आहे 'डायन'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकता कपूरचा ‘एक थी डायन’ हा सिनेमा जुन्या जमान्याच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर आधारित असल्याची चर्चा होती. या अभिनेत्रीने जितेंद्रसोबत अनेक सिनेमे केल्याचे बोलले जाते. एकता कपूर या अभिनेत्रीचे नाव सांगू इच्छित नव्हती. मात्र ते नाव अखेर लीक झालेच. हा सिनेमा रेखावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.

सिनेमातील एका युनिट मेंबरने नाव न छापण्याची विनंती करत सांगितले की, बॉलिवूडमध्ये रेखाचे जादूटोण्याशी संबंध असल्याच्या बातम्या येत होत्या. त्याचवेळी त्याला रेखावर रिसर्च करण्याचे आणि तिच्याशी मिळतेजुळते एक पात्र तयार करण्याचे सांगण्यात आले. त्याला रेखा जादूटोणा करत असल्याचे कळले. या विषयाची माहिती बॉलिवूडच्या काही लोकांनादेखील असल्याचे तो सांगतो.

त्याच्या मते, मंत्रविद्येचा अभ्यास करणार्‍या स्त्रिया सुंदर आणि त्यांचे केस लांब असतात. त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक असते. खरंच रेखाचे सुंदर दिसणे, तिचे लांब केस आणि तिच्या चेहर्‍यावर दिसणारी चमक या गोष्टीचे गुपित तर नाही. रेखाचे आयुष्यदेखील रहस्यमयी राहिले आहे. रेखा ज्या विद्येचा वापर करते ते हानिकारक नाही, असेही सांगितले जाते. हा ज्याच्या त्याच्या (अंध)श्रद्धेचा भाग आहे.