आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ekta Kapoor Become Superstitious For Movie Success

किती अंधश्रद्धाळू आहे एकता कपूर ? तुम्ही स्वतःच बघा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिलन लूथरिया दिग्दर्शित 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा' हा सिनेमा येत्या 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. सिनेमाच्या रिलीजला काही दिवस शिल्लक असताना आता या सिनेमाच्या प्रमोशन सुरुवात झाली आहे. अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक मिलन लुथरियाबरोबर या सिनेमाची निर्माती एकता कपूर हजर होती. नेहमीप्रमाणे चित्रविचित्र ड्रेस परिधान करणा-या एकताने या कार्यक्रमातसुद्धा तिच्यावर न शोभून दिसणारा ब्लॅक गाऊन परिधान केला होता.
ट्रेलर लाँच इवेंटला क्लिक झालेल्या छायाचित्रांमध्ये एकता खूप धार्मिक असल्याचे स्पष्ट दिसत होते. कारण एकताने तिच्या हाताच्या बोटांमध्ये रत्नजडित अंगठ्या घातल्या होत्या. सोबतच दोन्ही हातांना ताविज बांधले होते. अंगठ्या आणि ताविज बघता एकता याकाळात खूप पूजापाठ करत असल्याचे दिसून येत आहे. तसे बघता अलीकडच्या काळात एकता जुहू स्थित हरे राम हरे कृष्ण मंदिरात दिसली होती. येथे एकता नॅपकिनने आपला चेहरा लपवताना दिसली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा ट्रेलर लाँच इवेंटमध्ये क्लिक झालेली एकता कपूर आणि मिलन लुथरिया यांची छायाचित्रे...