आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ekta Kapoor Change Title Of Once Upon A Time In Mumbai Again

वैतागलेल्या एकताने सिनेमाचे नाव बदलले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन’ या सिनेमाने बालाजी फिल्मची दिग्दर्शिका एकता कपूरला चांगलेच त्रस्त केले आहे. हा सिनेमा सुरुवातीपासून कधी प्रदर्शनाची तारीख तर कधी थिएटर वॉरमध्ये अडकला आहे. सिनेमाच्या अडचणींवर मात करण्यासाठी एकताने म्हणे ज्योतिषशास्त्राची मदत घेतली आहे. त्यानुसार अलीकडेच तिने सिनेमाच्या नावात बदल केला आहे.

‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन’ ऐवजी तिने आता ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ असे नाव बदलले आहे. बालाजी फिल्म प्रोडक्शन कंपनीत जन्मपत्रिका पाहून लोकांना कामावर ठेवणार्‍या एकताने सिनेमाच्या सुरुवातीला शुभमुहूर्त पाहिला नसावा अशी टिप्पणी एकताच्या विरोधी गटातून केली जात आहे.