आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकता कपूर लवकरच अडकणार रेशीमगाठीत, नवरदेवाचे नाव गुलदस्त्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेलिव्हिजन क्वीन आणि निर्माती एकता कपूर लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. एकताच्या लग्नाबद्दल खुद्द तिच्या भावानेच खुलासा केला आहे.
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तुषारला पत्रकारांनी त्याच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना तुषार म्हणाला की, पहिले बहिणीचे लग्न व्हायला पाहिजे आणि लवकरच ती लग्न करणार आहे. तिच्या लग्नानंतर मी स्वतःच्या लग्नाचा विचार करणार आहे.
तसे पाहता तुषारने एकताचा लग्नाला ग्रीन सिग्नल असल्याचे स्पष्ट केले. मात्र तिचा जोडीदार कोण ? यावर त्याने हुशारीने मौन बाळगले.
आता एकताचा जोडीदार कोण बनणार ? एकता कुणाबरोबर सप्तपदी घेणार ? हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना थोडा काळ प्रतिक्षा करावी लागणार हे नक्की.