आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकता कपूरच्या इफ्तार पार्टीत जमली बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्माती एकता कपूरने मुंबईत मंगळवारी रात्री एका दगडाने दोन पक्षी मारले. एकताने रमजानच्या निमित्ताने एक शानदार इफ्तार पार्टी आयोजित केली आणि सोबतच आपल्या आगामी 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा' या सिनेमाचे प्रमोशनसुद्धा केले.

या इफ्तार पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी बघायला मिळाली. 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा' या सिनेमात मेन लीडमध्ये असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या आईवडिलांबरोबर या इफ्तार पार्टीत दिसली.
तर अक्षय कुमार त्याची पत्नी ट्विंकलबरोबर येथे आला होता. याशिवाय सोनम कपूर, कंगना राणावत, मलायका अरोरा खान, अरबाज खान, इमरान हाश्मी, सोनाली बेंद्रे, रणवीर सिंह, ऋषी कपूर, प्राची देसाई, चित्रांगदा सिंगसह ब-या सेलिब्रिटींनी इफ्तार पार्टी एन्जॉय केली.

बघा इफ्तार पार्टीची ही खास छायाचित्रे...