आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका आणि IPLचा बॉलिवूडच्या व्यवसायावर होणार परिणाम, मार्च-एप्रिलमध्ये येऊ शकते मंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विक्रम भट्ट दिग्दर्शित थ्रीडी 'क्रिएचर', '1920'चा तिसरा भाग, अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसचा 'फुग्ली', साजिद नाडियाडवाला प्रॉडक्शनचा 'हीरोपंत' आणि या सर्वांच्या पुढे अमिताभ बच्चन यांचा 'भूतनाथ रिटर्न्स'. या सर्व सिनेमांच्या रिलीज तारखेत बदल करण्याची तयारी चालू आहे. यांची रिलीज तारिख बदलण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकसभा निवडणुका आहेत. या निवडणुका एप्रिलच्या दुस-या आठवड्यापासून ते महिन्यातपर्यंत होणार आहेत.
त्यावेळी सिनेमा बघणा-या सर्व प्रेक्षकांचे लक्ष सिनेमांकडे नव्हे तर निवडणुकांकडे लागणार आहे. याचा परिणाम बॉलिवूडच्या व्यवसायावर होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत म्हणून सिनेमांच्या रिलीजच्या तारखा बदलण्याची तयारी केली जात आहे.
याहीपेक्षा आणखी एक सर्वात मोठे कारण आहे, की राजकिय नेत्यांनी 400 कोटी रुपये खर्च करून या दोन महिन्यासाठी टीव्हीवर त्यांच्या जाहिरातींचे प्रसारण करण्यासाठी वेळ खरेदी केले आहेत. त्यामुळे सिनेमाचे प्रमोशन होऊ शकत नसल्यानेही असा निर्णय घेण्यात येत आहे. सिनेमांचे निर्माते टीव्ही चॅनल्ससोबत वर्षभराची डिल एकदाच करतात ज्याचे भाव सामान्य जाहिरातीपेक्षा पाचपट जास्त असतात.
सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे थोड्या प्रमाणात सुट मिळते आणि त्यांच्या प्रसारणाचा वेळही फिक्स केला जातो. त्या दोन महिन्यांमध्ये चॅनल्स प्रोमो स्लॉट्स कमी किमतीत विकण्याच्या तयारीत नसल्याचेही सांगितले जात आहे. अलीकडेच केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे, की चॅनलला जाहिराती दाखवण्याच्या वेळेत 40 टक्के घट करण्यास सांगितले आहे. हा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.
याचा परिणाम कमी किमतीच्या जाहिरातींवर होणार आहे. एक महत्वपूर्ण बातमी अशी आहे, की सिनेमाच्या प्रदर्शनावेळी स्टार्स न्यूज चॅनलवर त्यांच्या सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठी येतात. परंतु निवडणुकिच्या काळात चॅनलवर फक्त राजकिय नेत्यांकडेच सर्वांचे लक्ष असणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सिनेमांच्या रिलीज तारखांमध्ये फेरबदलाचे दुसरे मोठे कारण...