आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इशा म्हणते, इमरान माझा मार्गदर्शक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महेश भट्ट यांच्या ‘जन्नत-2’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी हॉट अभिनेत्री इशा गुप्ता सध्या सीरिअल किसर इमरान हश्मीचे भलतेच गुणगाण गाऊ लागली आहे. जन्नतमध्ये मला इमरानने खूप मोलाचे मार्गदर्शन केल्याचे तिने नुकतेच एका मुलाखतीत म्हटले आहे.
भट्ट यांच्या ‘राज-3’ मध्ये पुन्हा एकदा ही हॉट जोडी आपल्या मादक अदा दाखवण्यासाठी तयार झाली आहे. या वेळी बोलताना इशाने सांगितले की, आय लव्ह इमरान. मला तो खूप आवडतो, ज्यावेळी ‘जन्नत-2’ च्या सेटवर माझी आणि इमरानची पहिल्यांदा भेट झाली त्यावेळी मला त्याची खूप भीती वाटली होती. मात्र, तो खूप चांगला असून त्याचा स्वभाव मनमिळावू आहे. एका सीनमध्ये मला तब्बल 30 वेळेस शॉट द्यावा लागला होता. त्यानंतर मला नैराश्य आले होते. मात्र, मला इमरानने धीर देत सीन कसे करायचे याच्या टिप्स दिल्या. तसेच तो खूप शांत असल्याचे इशाने म्हटले.
महेश भट्ट यांचा 2002 मध्ये आलेल्या ‘राज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भन्नाट यश मिळवले होते. या चित्रपटात डिनो मारिया, बिपाशा बसू आणि मालिनी शर्मा यांच्या भूमिका होत्या. तसेच यामधील गाणीही खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर भट्ट यांनी ‘राज-2’ बनवला. मात्र या चित्रपटाने अपेक्षित यश मिळवले नव्हते.
आता भट्ट पुन्हा राज-3 तयार करत आहेत. यामध्ये त्यांचा लाडका इशरान हश्मी दिसणार असून बिपाशा बसू, ज्ॉकलिन फर्नांडिस आणि इशा गुप्ताच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच हा चित्रपट थ्री-डी व्हर्जनमध्ये देखील येणार आहे. त्यामुळे इशा आणि भट्ट कॅम्पला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
प्रकाश झा यांचे चक्रव्यूह भेदणार - इशाने आजवर केवळ एकाच चित्रपटात काम केले आहे. तरी देखील तिला बॉलीवूडमध्ये चांगली मागणी आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘चक्रव्यूह’ या चित्रपटात इशा दिसणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल, मनोज वाजपेयी, अभय देओल, कबीर बेदी आणि ओम पुरी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 12 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.