आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emraan Hashmi News In Marathi, Son Operated For Tumour

इम्रान हाश्मीच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रीया, कॅन्सरचा ट्युमर काढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता इम्रान हाश्मीचा चार वर्षीय मुलगा अयान याच्या किडनीतील कॅन्सरचा ट्युमर डॉक्टरांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करून काढला आहे. येथील प्रसिद्ध हिंदुजा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
इम्राम हाश्मीचे काका आणि चित्रपट निर्माते महेश भट यांनी सांगितले, की अयानच्या किडनीत ट्युमर असल्याची माहिती इम्रानने मला दिली होती. सुरवातीला हा ट्युमर धोकादायक नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, सखोल तपासणी केल्यानंतर ट्युमर कॅन्सरचा असल्याचे आढळून आले होते. हा ट्युमर अगदी एखाद्या टाईम बॉम्बसारखा होता. त्यामुळे अयानच्या जीवाला धोका होता. त्यामुळे शस्त्रक्रीया करून हा ट्युमर काढण्यात आला. आता अयानची प्रकृती सुधारत आहे.
अयानवर आणखी काही दिवस उपचार करण्यात येणार असल्याचे सांगून महेश भट म्हणाले, की आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तरीही त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचार ठरविले जाणार आहेत. गरज भासल्यास केमोथेरपी केली जाईल, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.