आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emraan Hashmi To Play Aamir Khan's Role In Dil Hai Ki Manta Nahi

आमिरनंतर आता इमरान हाश्मी म्हणणार 'दिल है की मानता नही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किसींग किंग इमरान हाश्मी 'दिल है की मानता नही' या सिनेमाच्या रिमेकमध्ये आमिर खानच्या भूमिकेत झळकणार आहे. बॉलिवूडमध्ये चर्चा आहे, की महेश भट्ट आपल्या सुपरहिट 'दिल है की मानता नही' या सिनेमाचा रिमेक बनवणार आहेत.
असे सांगितले जाते की, या रिमेकमध्ये इमरान हाश्मीची मेन लीडसाठी निवड करण्यात आली आहे. महेश भट्ट यांनी सांगितले की, या सिनेमाच्या मुळ कथेत कोणताही फेरबदल करण्यात आलेला नसून तिच कथा या सिनेमात बघायला मिळेल. अद्याप या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
1991 साली रिलीज झालेल्या 'दिल की मानता नही' या रोमँटिक धाटणीच्या सिनेमात आमिर खान आणि पूजा भट्ट प्रमुख भूमिकेत झळकले होते.
या सिनेमाच्या रिमेकमध्ये पूजा भट्टची रणबीर कपूर आणि आलिया भट्टला कास्ट करण्याची इच्छा होती, अशी चर्चासुद्धा रंगली होती.