आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पहिल्या बॉण्ड गर्लबरोबर झळकणार इम्रान हाश्मी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये रोमँटिक सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेला सीरिअल किसर इम्रान हाश्मी लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार आहे. जेम्स बॉण्डच्या सिनेमांविषयी सगळ्यांनाच ठाऊक आहे. जेम्स बॉण्ड सीरिजचा पहिला सिनेमा 'दी लिविंग डे लाइट्स' या सिनेमातील नायिका मरियम डीआबो जी 1987 साली मिलोवीच्या नावाने प्रसिद्ध होती, तिच्याबरोबर इम्रान हाश्मीला काम करण्याची संधी मिळाली आहे.
सिडोमिर कोलर आणि मार्क्स या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. शिवाय सिनेमोर्फिकच्या प्रशिता चौधरी आणि सिख्या एन्टरटेन्मेंटचे गुनीत मोंगासुद्धा या सिनेमाशी जुळलेले आहेत.
हा सिनेमा ऑस्कर विनिंग 'नो मेन्स लँड' या सिनेमाचे दिग्दर्शक डेनिस टनोविक दिग्दर्शित करणार आहेत. सध्या ते आपल्या सिनेमाच्या संपूर्ण टीमबरोबर पटियालामध्ये आहेत.
सिख्या एन्टरटन्मेंटचे गुनीत मोंगा यांनी सांगितले की, 'मरियम डीआबो ही प्रसिद्ध अभिनेत्री या सिनेमाचा एक भाग असल्यामुळे आम्ही आनंदीत आहोत.'