आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीत रिलीज होणार 'इंग्लिश विंग्लिश'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रिलीज झालेला आणि श्रीदेवीचे कमबॅक ठरलेला सिनेमा म्हणजे 'इंग्लिश विंग्लिश'. या सिनेमाला भारताबरोबरच परदेशातही पसंतीची पावती मिळाली. आता हा सिनेमा या आठवड्यात जर्मनीतील 90 स्क्रिनवर रिलीज करण्यात येत आहे.
गौरी शिंदे दिग्दर्शित इरोज इंटरनॅशनलच्या या सिनेमाने भारत आणि बर्लिनसह वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक अवॉर्ड्स आपल्या नावी केल्येत.
हाँगकाँगमध्ये हा सिनेमा 7 स्क्रिन आणि 29 शोबरोबर रिलीज केला गेला. त्यामुळे 'इंग्लिश विंग्लिश'ला हाँगकाँगमधील आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठे हिंदी फिल्म रिलीज म्हटले जात आहे. शिवाय श्रीदेवीचेही या सिनेमाद्वारे यशस्वी कमबॅक झालेच आहे.