आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या मेंदी कार्यक्रमापूर्वी पाय घसरून पडली ईशा, हाताला झाले फ्रॅक्चर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देओल कुटुंबीय सध्या अहानाच्या लग्नामध्ये व्यस्त आहेत. आज रात्री ती उद्योगपती वैभवसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. परंतु अशाचवेळी अहानाची बहीण अर्थातच ईशाच्या हाताला जखम झालेली दिसली आहे. अहानाच्या मेंदीच्या समारंभापूर्वी ती पाय घसरून पडली होती आणि तिच्या खांदा फ्रॅक्चर झाला आहे.
हामामालिनीच्या सांगण्यानुसार, ईशाने अहानाच्या मेंदी समारंभात धमाकेदार परफॉर्मेन्स देण्याची योजना बनवली होती. परंतु या घटनेने तिच्या योजनेवर पानी फेरले. ईशाला अहानाच्या संगीत समारंभात हाताला बँडेज लावलेले बघितल्या गेले होते.
सोबतच, असा अंदाज व्यक्त केला जात होता, की अहानाच्या लग्नात सनी-बॉबी दोघेही उपस्थित राहणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र आणि हेमा यांनी प्रकाश कौर (सनी-बॉबी यांच्या आई) यांची माफी मागून सांगितले ,की सनी आणि बॉबी अहानाच्या लग्नापासून दुर राहणेच ठिक राहिल. धर्मेंद्र-हेमा यांच्या सांगण्यानुसार, सनी आणि बॉबी यांच्या मनात त्यांच्या बहिणींविषयी कोणतीही दुर्भावना नाहीये. दोघेही त्यांच्या बहिणींवर खूप प्रेम करतात.
शनिवार 1 फेब्रुवारीला अहानाचा संगीत समारंभ पार पडला, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अहानाच्या संगीत समारंभाच्या छायाचित्रांमध्ये ईशाच्या हाताला होती जखम...