आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Esha’S Marriage Had Wept Dharmendra, Danced Well HEMA

ईशाच्या लग्नात खूप थिरकल्या होत्या हेमामालिनी, धर्मेंद्र यांना कोसळले होते रडू, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची लाडकी कन्या अहानाचा 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल आयटीसी मराठा येथे लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हेमामालिनी यांच्या घरचे हे शेवटचे लग्न असल्याने त्यांना या लग्नात कोणतीही कसर शिल्लक ठेवायची नाहीये. मेंदी, संगीत कार्यक्रमापासून ते लग्नाच्या रिसेप्शनपर्यंतच्या सर्व तयारीत हेमामालिनी स्वतः लक्ष देत आहेत. या लग्नात बॉलिवू़डसह राजकिय क्षेत्रातील दिग्गज पोहचणार असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाची तयारी पाहता हा लग्नसोहळा मोठ्या थाटात संपन्न होईल असं दिसतंय. मात्र जेव्हा अहानाच्या विदाईची वेळ येईल तेव्हा नक्कीच जुन्या आठवणीदेखील ताज्या होतील. जेव्हा हेमामालिनी यांची थोरली कन्या ईशा देओलची विदाई झाली होती, तेव्हा वडील धर्मेंद्र यांचे डोळे पाणावले होते.
29 जून 2012 रोजी ईशा देओलचे लग्न मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक भरत तख्तानीसह झाले होते. या लग्नात हेमामालिनी, धर्मेंद्र आणि अहानासह सर्व मित्र आणि नातेवाईकांनी भरपूर एन्जॉय केले होते. भरत तख्तानीदेखील लग्नात थिरकताना दिसले होते. हेमामालिनी यांनीही मुलीच्या लग्नात ताल धरला होता. ईशाच्या लग्नात भाऊ सनी आणि बॉबी यांनी मात्र हजेरी लावली नव्हती. सनी आणि बॉबी ईशाचे सावत्र भाऊ आहेत. तिच्या लग्नात भावाची सर्व कर्तव्यं तिचा चुलत भाऊ अभय देओलने पार पाडली होती. वर-वधूला आशीर्वाद देण्यासाठी बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मनोज कुमार, सायरा बानो, फरदीन खान आणि सलमान खान आले होते.
ईशाच्या लग्नातील वरमाळा घालण्याचा कार्यक्रम मुंबईतील प्रसिद्ध इस्कॉन मंदिरात झाला होता. 25 जून रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संगीताचा कार्यक्रम त्यानंतर 28 जूनला मेंदीची विधी पार पडली होती. 29 जूनला लग्न आणि 30 जूनला शानदार रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. ईशाची जेव्हा विदाई झाली होती, त्यावेळी धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांचे डोळे पाणावले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ईशाच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत... पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा ईशाच्या लग्नाची खास छायाचित्रे. ही छायाचित्रे लग्नातील व्हिडिओमधून घेण्यात आली आहेत.
(व्हिडिओ साभार यूट्यूब)