आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुप्रीम कोर्टाने सुनावली आहे. या बातमीमुळे संजय दत्तसह त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. संजयने यापूर्वी दीड वर्षे शिक्षा भोगल्यामुळे त्याला आता साडे तीन वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. कोर्टाने निकाल जाहीर करताच संजय दत्तची बहीण प्रिया दत्तला अश्रू आवरता आले नाही. यावेळी संजयची पत्नी मान्यताही त्याच्याबरोबर हजर होती.
शिक्षा सुनावल्यानंतर संजय दत्तने म्हटले की, ''कोर्टाच्या निर्णयाचा मी आदर करतो. मी आपल्या देवाकडे प्रार्थना करेल, देव महान आहे.''
आमच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर संजय दत्तला रडू कोसळले होते. त्याने निराश होऊन आपल्या कुटुंबियांना आलिंगन घातले. यावेळी मान्यता दत्त त्याचा हात आपल्या हातात पकडून उभी होती.
निकालाच्या पार्श्वभूमीवर संजयने फिल्मसिटीत सुरु असलेले त्याच्या आगामी 'पोलिसगिरी' या सिनेमाचे शुटिंगही रद्द केले होते. संजयने गेले दोन दिवस आपला जास्तीत जास्त वेळ पत्नी आणि दोन्ही मुलांबरोबर घालवला. शिवाय काल (बुधवार) दिवसभर तो न्यूज चॅनलवरील मुंबई बॉम्ब स्फोटाच्या संदर्भातील बातम्या बघत होता, आणि सतत आपल्या वकिलांच्या संपर्कात होता असेही सुत्रांकडून समजले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.