आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive: Amitabh Bachchan Surprises Estranged Friend Amar Singh With A Hug; Abhishek Touches His Feet

गळाभेटीविषयी अमरसिंह म्हणाले, \'माझ्यामागे आले होते अमिताभ, आमच्यात पॅचअप झालेले नाही\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चित्रपट निर्माते कुमार मंगत यांची मुलगी अमिता पाठक आणि गायक राघव सच्चर यांचा नुकताच मुंबईत शुभविवाह झाला. या लग्नात सर्वांच्या नजरा खिळून होत्या त्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि माजी सपा नेते अमर सिंह यांच्यावर. पार्टीत समोरासमोर आलेल्या या दोन दिग्गजांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. खरं तर मैत्रीचा हात बिग बींनीच पुढे केला. अमिताभ बच्चन यांनी आपला राग बाजुला सारुन अमर सिंह यांची गळाभेट घेतली. तर अभिषेक बच्चन अमर सिंह यांचा मान ठेवत त्यांच्या पाया पडला. अमर सिंह यांनीदेखील अभिषेकला अलिंगन दिले.
या भेटीनंतर बिग बी आणि अमरसिंह यांच्यात आता सर्व काही आलबेल असल्याचे वाटत होते. मात्र जेव्हा याविषयी अमरसिंह यांच्यासोबत चर्चा झाली, तेव्हा वेगळेच रुप समोर आले. अमरसिंह म्हणाले, 'अमिताभ आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचे पॅचअप झालेले नाही. मी तेथून निघून गेलो होतो. तेव्हा अमिताभ यांचा मला मेसेज आला, की त्यांना मला भेटायचे आहे. मी बिझी असल्याचे त्यांना कळवले. मात्र तरीदेखील ते मला भेटायला माझ्या खोलीत आले, तर मी काय करु? माझ्या मते, या इंडस्ट्रीत कुणीही कुणाचा मित्र नसतो. विचित्र इंडस्ट्री आहे ही. अमिताभ बच्चन त्यांच्या जागी योग्य आहेत. त्यांच्याशी माझा कोणताही वाद नाही. ते मोठे माणूस आहेत आणि मी छोटा आहे.'
असो, अमरसिंह यांच्या या वक्तव्यावरुन त्यांचे अमिताभ यांच्याशी पॅचअप झाले नाही, हे तर स्पष्ट होतंय. लग्नस्थळी हजर असलेल्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ त्यांचा मुलगा अभिषेकसह लग्नस्थळी पोहोचले होते. हॉटेलमध्ये एन्ट्री घेताना अमिताभ यांचं लक्ष अमर सिंह यांच्याकडे गेलं. मात्र सुरुवातील ते त्यांची नजर चुकवून तेथून निघून गेले. तर अमर सिंहसुद्धा अमिताभ यांच्याकडे कानाडोळा करत पुढे निघाले. त्यानंतर अमिताभ अमिता आणि राघवला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला स्टेजवर गेले. स्टेजवर उभे असलेले अमिताभ अमर सिंह यांना शोधू लागले. तेथे अमर सिंह आपल्या खासगी खोलीत असल्याचे अमिताभ यांना समजले. अमिताभ अमर सिंह यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेले, तर त्यांना ते दारातच उभे दिसले. दारात उभे असलेल्या अमर सिंह यांना अमिताभ यांनी मागूनच अलिंगन दिलं. आश्चर्यचकित झालेल्या अमर सिंह यांनी मागे वळून पाहिले असता अमिताभ त्यांना दिसले. त्यांनीही वेळ न दवडता अमिताभ यांना अलिंगन दिले.
अमरसिंह यांनी मीडियाला सांगितले, ''जया बच्चन यांना राज्यसभेपर्यंत घेऊन गेलो, ही माझी चुक होती. त्या माझ्याच विरोधात उभ्या राहतील, असा विचारसुद्धा मी केला नव्हता. आता मी पुन्हा त्यांच्याशी मैत्री कशी करु शकतो.''
अभिषेकच्या पाया पडण्याविषयी अमरसिंह यांना विचारले असता ते म्हणाले, 'अखिलेश (अखिलेश सिंह यादव)सुद्धा माझ्या पाया पडतो. जेव्हा अभिषेक माझ्या पाया पडल्या तेव्हा मी त्याला आशीर्वाद दिले. तो मला मुलाप्रमाणे आहे. त्याची चुक काय? त्याच्याशी कसले शत्रुत्व?'
अमरसिंह पुढे म्हणाले, की कुणीही याविषयी काही बोलायला नको. आमच्यात केवळ दोनच मिनिटं बोलणं झालं. त्यावेळी अमिताभ यांनी माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली. यापेक्षा जास्त बोलणं आमच्यात झालं नाही.
पुढील स्लाईड्सवर वाचा, अमर सिंह यांनी आनंदाने अभिषेकला दिले अलिंगन...