आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE INTERVIEW: तुम्ही सनी लिओनचे चारित्र्य नाही, अभिनय बघा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रागिनी MMS 2'ची अभिनेत्री सनी लिओन तिच्या या सिनेमात एका नवीन अवतारात दिसणार आहे. ती 'जिस्म 2'पेक्षा या सिनेमात ब-याच वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
भारतीय वंशाची कॅनाडिअन रहिवाशी सनी लिओन 'रागिनी MMS 2'च्या प्रमोशनसाठी गुरूवारी भोपाळला गेली होती. ती जेव्हा सकाळी मुंबईवरून भोपाळला पोहोचली तेव्हा तिचा लूक वेगळा होता. परंतु जेव्हा ती दुपारी माध्यमांना आणि चाहत्यांना भेटली तेव्हा ती पूर्णत: भारतीय वेशभूषेत दिसली. सकाळी तिने जीन्स, जॅकेट आणि कॅप घातलेली होती आणि दुपारी पंजाबी सूटमध्ये दिसली.
तिचा हा लूक प्रमोशनसाठी केला गेला होता. सनीने तिथे 'रागिनी MMS 2'च्या लोकप्रिय 'बेबी डॉल' या गाण्यावर ठुमके लावले. कुमार लिखित या गाण्याचे बोल पंजाबी असून सनीने सिनेमात यावर बोल्ड डान्स केला आहे. तसे पाहता सनी मुळची पंजाबची आहे तिला पंजाबी सूट परिधान करणे खूप आवडते.
32 वर्षीय करनजीत कौर वोहरा अर्थातच सनी लिओन म्हणते, की तुम्हाला अमेरिका आणि भारतात तिचा अंदाज खूप वेगळा दिसेल. ती पुढे म्हणते, 'तुम्ही माझ्या मागील प्रतिमेचा विचार करू नका. 'जिस्म 2' आणि 'रागिनी MMS 2'मध्ये बोल्ड सीन देण्याची मला मागणी होती. तुम्ही त्या पात्रासोबतच माझा अभिनयसुध्दा बघा.'
5 फुट 4 इंच हाइट असलेली सनी म्हणते, की तिला विविध भूमिका करायच्या आहेत. यानंतरच्या सिनेमात तुम्ही मला एका नवीन भूमिकेत बघाल. ती देवांग ढोलकियाच्या 'टीना अँड लोलो' सिनेमाविषयी सांगत होती. सनीने या सिनेमात अ‍ॅक्शन सीन केले आहेत. ती म्हणते, 'कुणाच्या चेह-यावर हसू आणणे खूप कठिण आहे. परंतु त्याच व्यक्तीला रडवणे खूप सोप आहे. माझे असे म्हणणे आहे, की तुम्ही तुमच्या वर्तनाने इतरांना आनंद द्या. हेच आयुष्य आहे.'
ती तिच्या विरोधकांना उत्तर देते:
ज्यांना माझे सिनेमे बघायचे आहेत त्यांनी बघावे, नाही बघायचे तर बघू नका. परंतु मी इतके अवश्य म्हणेल, की तुम्ही असा विरोध करू नका ज्यामुळे इतरांना त्रास होईल. सनीने 2011मध्ये 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाली होती. ती तिच्या या एंट्रीला करिअरचा एक टर्निंग पॉइंट मानते. कारण ती म्हणते, की 'बिग बॉस'मध्ये आल्यानंतरच तिला दिग्दर्शक महेश भट्ट यांनी 'जिस्म 2'मध्ये अभिनयाची संधी दिली होती.
प्रियांका चोप्रा आणि एकता कपूर यांना आपला आदर्श मानणा-या सनीच्या मते, त्या दोघीही खूप प्रोफेशन आहेत. आपले काम उत्कृष्टपणे पार पाडतात. बॉलिवूडच्या खान त्रिकूटासोबत काम करण्याची इच्छा असलेली सनी म्हणते, सर्वात पहिले तिला आमिर खानसोबत काम करायचे आहे.
सनीसोबत सावलीप्रमाणे उभा राहणारा तिचा पती डेनिअल वेबरला तिच्यावर गर्व आहे. तो सनीचा चांगूलपणा सांगताना म्हणतो, की सनी एक चांगली पत्नी, चांगली मैत्रिण आहे, तसेच, ती तिच्या कामात निपूण असून स्वत:ला आपल्या कामा झोकून देते. तिने व्हर्सेटाइल प्रतिमा सिदध्द केली आहे. डेनिअल सनीला विनोदी अंदाजात म्हणतो, तिची एकच वाईट सवय आहे, सनी घरातील लाइट लावल्यानंतर कधीच ते बंद करायचे तिच्या लक्ष राहत नाही.
'94.3 माय एफएम'मध्येसु्दा पोहोचली होती सनी
फन सिनेमानंतर सनी लिओन दैनिक भास्कर परिसरात असलेल्या '94.3 माय एफएम' रेडिओ स्टेशनमध्येसुध्दा गेली होती. तिथे तिने सिनेमाविषयीच्या रंजक गोष्टी शेअर केल्या. यावेळी सनीसोबत तिचे बॉडीगार्ड्ससुध्दा उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सनीची काही खास छायाचित्रे...