आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive Picture Of Akshay Kumar Card Party At His Home

बॉलिवूड सेलिब्रेशन मूडमध्ये : अक्षय कुमार खेळला कार्ड, पाहा EXCLUSIVE छायाचित्रे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड दंग असून, अनेकांनी पार्टीचे आयोजन केले आहे. निता अंबानीच्या 50 वाढदिवसनिमित्त बॉलिवूडची अनेक मंडळी जोधपूरला पार्टी करण्यासाठी गेली होती. त्यामुळे या पार्ट्या थोड्या उशिराने सुरु होत आहेत. तरीही दोन दिवसापासून हा सिलसिला सुरु झाला आहे. सर्वप्रथम एकता कपूरने पार्टी दिली. त्यानंतर अक्षय कुमारने दिली तर शनिवारी रात्री सचिन जोशीने जोरदार पार्टी दिली.
ही दिवाळी काही सिता-यासाठी डबल धमाका घेऊन आली आहे. कारण दिवाळीच्या काळातच त्याचे वाढदिवस आले आहेत. यात ऐश्‍वर्या राय हिने 1 नोव्हेंबरने वाढदिवस साजरा केला. तर दोन नोव्हेंबरला शाहरुख वाढदिवस साजरा करीत आहे.
दुसरीकडे, धनतेरसच्या दिवशी बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने आपल्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली नाही पण अक्षयकुमारचा एक फोटो मात्र जरूर आमच्या हाती लागला आहे. या पार्टीतील मिळालेल्या फोटोत अक्की सोनाक्षी सिन्हा आणि इतर मित्रांसोबत मस्ती करीत असलेल्या मूडमध्ये दिसून येत आहे. त्याने दोन्ही हातात नोटा पकडताना दिसत आहे त्यामुळे उघड होते की धनतेरसच्या दिवशी पार्टीत कार्डही खेळले गेले आहे.
टिव्ही मालिका बनविण्यात हातखंडा असणा-या एकता कपूर जर वर्षी दिवाळी पार्टीत अशी कार्ड पार्टी करते. ती आपल्या मित्रांना या दिवशी कार्ड खेळण्यासाठी आमंत्रित करते व ते सर्व ती एन्जॉय करते. या वर्षी एकताने साजरी केलेल्या पार्टीतील पाहुण्यांची छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पुढे पाहा...