आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातामुळे बिघडला चेहरा, पतीच्या निधनानंतर आता अज्ञातवासात आहे ही अभिनेत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


60च्या दशकातील हिंदी सिनेसृष्टीतील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे साधना. आज (2 सप्टेंबर) साधनाचा 71वा वाढदिवस आहे. आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये साधनाने यशोशिखर गाठले होते. तरुणींमध्ये चुडीदार सलवारची फॅशन आणण्याचं श्रेय साधनालाच जातं. तिची हेअरस्टाईल आजही साधना कट नावाने प्रसिद्ध आहे.

साधना सध्या फिल्मी दुनियेपासून अज्ञातवासात आयुष्य व्यतित करत आहे. अलीकडेच एका सिनेमाच्या स्क्रिनिंगला ती ब-याच दिवसांनी दिसली. तिला बघून ही एकेकाळची नावाजलेली अभिनेत्री साधनाच आहे, हे ओळखणं कठीण झालं होतं.
काही वर्षांपूर्वी एका अपघातात साधनाच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली होती. त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे बदलला.

आज साधनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया तिच्या फिल्मी करिअर आणि खासगी आयुष्यावर...