Home »Top Story» Farah Khan's Kids Do 'Ta Thaiya' With Mommy

फराह खानच्या मुलांचे 'था थय्या था थय्या...'

भास्कर नेटवर्क | Jan 08, 2013, 16:19 PM IST

  • फराह खानच्या मुलांचे 'था थय्या था थय्या...'

हे छायाचित्र आहे कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या मुलांचे. आता डोक्यावर मडकी घेऊन फराहची ही तिळी मुलं काय करतायत असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना.

झाले असे की, फराह खान सध्या साजिद खानच्या 'हिम्मतवाला' सिनेमातील 'था थय्या था थय्या...' हे गाणे कोरिओग्राफ करत आहे. या गाण्याचे शुटिंग मुंबईजवळील अक्सा बीच येथे सुरु आहे. फराह आपल्या तिन्ही मुलांना शुटिंग स्थळी घेऊन गेली होती. तेव्हा सिझर, दिवा आणि अन्या या तिन्ही मुलांना डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेली मडकी आपल्या डोक्यावर घेऊन चक्क डान्स केला.
शुटिंगस्थळी उपस्थित असलेल्या सगळ्यांनी या तिघांचा डान्स एन्जॉय केला.

Next Article

Recommended