आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farhan Akhtar And Rebecca's Intimate Scenes Removed From Bhaag Milkha Bhaag

या तरुणीबरोबर रोमान्स करताना दिसणार नाही मिल्खा, इंटीमेट सीन्सला लागली कात्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'भाग मिल्खा भाग' हा सिनेमा भारतातील प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंहच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या सिनेमात मिल्खा सिंहच्या आयुष्यातील अनेक प्रसंग रेखाटण्यात आले आहेत.

या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितले, की हा सिनेमा फक्त मिल्खा सिंहच्या करिअरवर आधारित नसून खासगी जीवनात त्यांनी बघितलेले चढउतारही यात दाखवण्यात आले आहेत.

अलीकडेच या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये फरहान अख्तर आणि ऑस्ट्रेलियन अभिनेत्री रेबेका यांच्यावर चित्रीत करण्यात आलेला किसींग सीन बघून प्रेक्षक अचंबित झाले होते. खरं तर सिनेमात या दोघांचा एकमेव किसींग सीन नाहीये तर भरपूर इंटीमेट सीन्स या दोघांवर चित्रीत करण्यात आले आहेत. मात्र आता निर्माता-दिग्दर्शकांनी सिनेमातील काही इंटीमेट सीन्सला कात्री लावण्याचे ठरवले आहे. खरं तर ही सगळी दृश्य सिनेमात महत्त्वाची आहेत, मात्र या दृश्यांमुळे सिनेमाचा मुळ उद्देश बदलू नये, असं त्यांना वाटतं.

सिनेमाच्या कथेनुसार, मिल्खाची भूमिका साकारणा-या फरहान आणि रेबेकाची भेट ऑस्ट्रेलियात होणा-या ऑलंपिकदरम्यान होते आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. सिनेमाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांची प्रेमकहाणी सिनेमात खूप रंजक पद्धतीने चित्रीत करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या 12 जुलै रोजी रिलीज होतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा फरहान-रेबेकाची ऑन स्क्रिन केमिस्ट्री...