आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farhan Akhtar Goes On Boy\'s Night Out In Auto Rickshaw

फरहानने ऑटो-रिक्षामध्ये मित्रांसोबत केला प्रवास, मद्यपान करून सिनेमाचे केले प्रमोशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म इंडस्ट्रीचा प्रसिध्द अभिनेता फरहान अख्तर तसे पाहता ख -या आयुष्यात फार लाजाळू स्वभावाचा आहे मात्र 21 जानेवारीच्या रात्री त्याचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला. फराहानने त्याच्या मित्रांसोबत एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अभिनेता वीर दास आणि दिग्दर्शक साकेत चौधरीसुध्दा सामील होते.
हे सर्व लोक मुंबईच्या एका प्रसिध्द रेस्ट्रो बारमध्ये पार्टीसाठी गेले होते. यावेळी ते चक्क गाडी सोडून ऑटो-रिक्षामध्ये प्रवास करताना दिसले. फराहान अख्तरच्या आगामी 'शादी के साइड इफेक्ट्स' सिनेमाच्या प्रमोशनची एक वेगळी पध्दत होती. या सिनेमात फराहान विद्या बालनच्या पतीची भूमिका साकारत आहे.
फरहानची ही पार्टी एका बॅचलर पार्टीसारखी होती. या पार्टीमध्ये विद्या बालन सामील झाली नव्हती. परंतु फरहान त्याच्या मित्रांसोबत खूप आनंदी दिसत होता, जेव्हा फरहानला विद्याविषयी विचारले तर तो म्हणाला, 'विद्यालाही या पार्टीत बोलवण्यात आले होते, परंतु तिला या पार्टीत सामील होऊन आमच्या बॅचलर पार्टीचा आनंद खराब करायचा नव्हता.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा फरहानच्या या पार्टीचे काही छायाचित्रे आणि जाणून घ्या सिनेमाच्या प्रमोशनविषयी अधिक माहिती...