आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farhan Akhtar On Bhaag Milkha Bhaag And Naseeruddin

\'भाग मिल्खा...\'वर नसीर यांनी केली होती टीका, प्रत्युत्तर देण्यास फरहानचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा 'भाग मिल्खा भाग'मध्ये मिल्खा सिंगची भूमिका साकारण-या फरहानने सिध्द केले, की तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे आणि कोणत्याही प्रकारची भूमिका करू शकतो. मागील काही दिवसांपूर्वी 'भाग मिल्खा भाग'विषयी नसीरुद्दीन शाह म्हणाले होते, की हा सिनेमा अर्ध्यापेक्षा जास्त नाटकी आहे.
याविषयी फरहानला विचारले तर त्याने यावर बोलण्यास नकार दिला होता. फरहान म्हणाला, की त्याला नसीरुद्दीन यांच्यासोबत कोणताच वाद घालायचा नाहीये. फरहानने स्पष्ट सांगितले, 'हे त्यांचे मत आहे आणि त्यासाठी ते जबाबदार आहेत. मला कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाहीये.'
फरहान जेव्हा त्याचा आगामी 'शादी के साइड इफेक्ट्स' या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी एका कार्यक्रमात गेला होता तेव्हा त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता. नसीरुद्दीन अलिकडेच म्हणाले होते, 'राकेश ओमप्रकाश मेहराने एक बनावट सिनेमा बनवला आहे. फरहानने जी बॉडी वाढवली आणि केस वाढवले, त्याला खरा अभिनय म्हणता येणार नाही.'
शबाना आझमी आणि लेखक प्रसून जोशी सिनेमाची बाजू घेत म्हणाले होते, की ते नसीर यांच्या मताशी सहमत नाहीये. 'भाग मिल्खा भाग' हा एका महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनपटावर आधारित सिनेमा आहे. या सिनेमात फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची भूमिका वठवली होती. या सिनेमाने 100 कोटींची कमाई केली होती.