आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farhan, Vidhya And Ekta Promte Shaadi Ke Side Effects

विद्या-फरहानसह एकतानेही केले \'शादी के साइड इफेक्ट्स\'चे प्रमोशन, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता फरहान अख्तर काही दिवसांपासून त्याच्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. 'शादी के साइड इफेक्ट्स' हा त्यांचा सिनेमा 28 फेब्रुवारीला रिलीज होणारा आहे. काल (26 फेब्रुवारी) ही जोडी सिनेमाच्या प्रमोशनासाठी दिल्लीला पोहोचली होती. या दोघांसोबत निर्माती एकता कपूरसुध्दा सिनेमा प्रमोट करताना दिसली.
यावेळी विद्या आणि एकताने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्या दोघीही खूप आकर्षक दिसत होत्या. तसेच, फरहान नेहमी सारखाच फिट आणि कूल अंदाजात दिसला.
'शादी के साइड इफेक्ट्स' एक विनोदी सिनेमा आहे. सिनेमात विद्या आणि फरहान यांच्याव्यतिरिक्त राम कपूर, गौतमी कपूर आणि वीर दास यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक साकेत चौधरी आहेत. एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे.
'शादी के साइड इफेक्ट्स' हा 2006मध्ये रिलीज झालेल्या 'प्यार के साइड इफेक्ट्स' सिनेमाचा सीक्वल आहे. या विनोदी सिनेमात विद्या आणि फरहान यांचा नटखट अंदाज आणि त्यांचे घरगुती वादविवाद दाखवण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सिनेमाच्या प्रमोशन करताना फरहान, विद्या आणि एकता कपूर यांची काही खास छायाचित्रे...