आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father And Father In Law Meet Sussanne For Patch Up?

हृतिक-सुझानच्या Patch-Upच्या प्रयत्नांना वेग, राकेश रोशन यांनी घेतली संजय खानची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या लग्नाच्या तेराव्या वाढदिवसाच्या (20 डिसेंबर 2013) ठिक सात दिवसांपूर्वी (13 डिसेंबर 2013) हे दोघे वेगळे झाले होते. विभक्त झाल्यानंतर हृतिकने 10 जानेवारीला दोन्ही मुलांसह आपला वाढदिवस साजरा केला, मात्र हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सुझान आली नव्हती.
या दोघांचा घटस्फोट होऊ नये आणि त्यांनी पुन्हा गुण्यागोविंदाने संसार करावा, यासाठी दोघांचेही कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. याचनिमित्ताने अलीकडेच राकेश रोशन यांनी संजय खानची भेट घेतली. आणि त्यानंतर या दोघांनी मिळून सुझानची भेट घेतली. अभिनेता संजय खान सुझानचे वडील आहेत, तर राकेश रोशन तिचे सासरे आहेत.
सुझानने पुन्हा एकदा घरी परतावे आणि संसाराची गाडी रुळावर यावी, अशी हृतिकचीसुद्धा इच्छा आहे. सुझान सध्या वर्सोवा येथील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहात आहेत.
असे ऐकिवात आहे, की राकेश रोशन आणि संजय खान यांनी सुझान आणि तिच्या दोन्ही मुलांची भेट घेतली. या भेटीचा परिणाम काय झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीये. याप्रकरणी जाएद खाननेही सुझानची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. जाएद सुझानचा सख्खा भाऊ असून हृतिकचा मेव्हणा आहे. अद्याप हृतिक आणि सुझान कायदेशीररित्या विभक्त झालेले नाहीत.
हृतिक-सुझानच्या नात्यात वितुष्ठ...
20 डिसेंबर 2000 रोजी हृतिक आणि सुझान यांचे लग्न झाले होते. लग्नपूर्वी चार वर्षे जुनी यांची मैत्री होती. या दोघांना दोन मुले असून रिहान (वय वर्षे 7) आणि रिदान (वय वर्षे 5) ही त्यांची नावे आहेत. सुझान हृतिकचे घर सोडून वर्सोवा येथे आपल्या दोन्ही मुलांसह राहात आहे. घटस्फोटाचा निर्णय घेऊन हे दोघे आपले 17 वर्षे जुने नाते संपुष्टात आणत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, सुझानपेक्षा हृतिकवर का जास्त प्रेम करतात रेहान आणि रिदान...