आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतरा माळीचे वडील जगदीश यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री अंतरा माळी हिचे वडील आणि प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी यांचे आज सकाळी नानावटी रूग्णालयात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.

माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून मुत्रपिंडाच्‍या आजाराने त्रस्‍त होते. तसेच मानसिकदृष्‍ट्याही ते अतिशय कमकुवत झाले होते. दारुच्‍या व्‍यसनामुळे ते डिप्रेशनमध्‍ये गेले होते. यावर्षीच्‍या सुरुवातीला ते अचानक चर्चेत आले होते. मॉडेल आणि अभिनेत्री मिंक ब्रार हिने त्‍यांना मुंबईच्‍या रस्‍त्‍यांवर भीक मागताना पाहिले होते. त्‍यावेळी तिने सलमान खानला संपर्क केला होता. सलमानने गाडी पाठवून जगदीश माळी यांना घरी पोहोचविले होते.