आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोण : नेटवर स्थिर शटल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी ‘कॉकटेल’ आणि ‘रेस’ चित्रपटांनंतर दीपिका पदुकोण रणबीर कपूरसोबतचा ‘ये जवानी है दीवानी’ देखील फार यशस्वी झाला. यशाच्या या त्रिकुटानंतर ती आपला पहिला नायक शाहरुख खानसोबत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ मध्ये दिसणार आहे. वर्षाच्या शेवटी संजय लीला भन्साळीचा ‘रामलीला’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यावर्षी ती पाच यशस्वी चित्रपटांत काम करून कतरिना कैफच्या सिंहासनाला आव्हान देऊ शकते. रणबीर कपूर आणि दीपिकाचा प्रेमभंग झाल्यानंतर कतरिनाने तिची जागा घेतली होती, त्यामुळे हा बदला ती व्यावसायिक क्षेत्रात घेऊ शकते. भन्साळीच्या ‘सांवरिया’ नंतर रणबीर कपूरने त्यांच्यासोबत पुन्हा काम टाळल्याची अंतर्गत चर्चा आहे. शाहरुख खान आणि दीपिकाचा पहिला ‘ओम शांती ओम’ आणि ‘सांवरिया’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यामुळे दोन्ही निर्मात्यांमध्ये दुरावा आला होता. त्याचवेळी दीपिका आणि रणबीरमध्ये गोड संबंध झाले होते.