आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लाइफ गोज ऑन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल शर्मिला टागोर यांना जयपूर चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मानित करण्यासाठी हेमा मालिनी आणि प्रेम चोप्रा उपस्थित होते. त्यानंतर संगीता दत्ता यांचा ‘लाइफ गोज ऑन’ हा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटात शर्मिला टागोर यांची भूमिका आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून हा चित्रपट निवडल्याबद्दल आयोजकांना शुभेच्छा. शर्मिला यांची मुलगी सोहा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तिने चांगला अभिनय करून आपल्या आईला भेट दिली आहे. गिरीश कर्नाड आणि ओम पुरी सारख्या निष्णात अभिनेत्यांनी चित्रपटाला हृदयस्पर्शी बनवले आहे. अभिनेत्यांची करुणा आणि चांगला स्वभाव प्रेक्षकांच्या काळजाला भिडतो. चित्रपट कलेत चालती-फिरती छायाचित्रे असतात किंवा प्रोजेक्शन खोलीत रील फिरत असते. त्यामुळे त्याला मुव्हीज म्हणत नाहीत तर आपल्या प्रभावाने चित्रपटगृहात बसलेल्या प्रेक्षकांच्या मनातील भावनांना गती देतात म्हणून चित्रपट कलेला मुव्हीज म्हणतात. म्हणजेच ‘स्थिर’ असते तेच ‘गतिमान’ असते.

असो, मृत्यू जीवनाचा शेवट नाही, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. जीवन प्रत्येक परिस्थितीत सुरू असते. जणू काही ‘चलना जीवन की कहानी, रुकना मौत की निशानी’ जीवनाच्या वाक्यात मृत्यू फक्त अर्धविराम आहे, त्याला पूर्णविराम समजू नये. चित्रपटाच्या सुरुवातीलाच यशस्वी-समृद्ध डॉ. गिरीश कर्नाडच्या पत्नी शर्मिला टागोर अभिनीत पात्राचा मृत्यू होतो. मृत्यूच्या आधी आनंदाने आपल्या कुटुंबासाठी जेवण बनवताना ती टीव्हीवर मॅचसुद्धा पाहत असते. भारत जिंकल्यावर खुश होते. जणू काही ती आयुष्याचा भरपूर आनंद घेत असते. एकत्र मात्र छोट्या दृश्यात पात्राची ओळख करून देण्यात आली आहे. नातेवाईक येईपर्यंत अंत्यसंस्कार आठवडाभरानंतर करण्यात येणार आहे. या आठवडाभरात तिच्या तीन मुलींना अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र आईसोबत घालवलेल्या दिवसांचे अनुभव त्यांना समस्या सोडवण्यात मदत करतात. डॉक्टर साहेबांनी आयुष्यभर आपल्या कामात बुडून पैसा आणि यश कमावले आहे. लंडनमध्ये असलेल्या बंगाली कुटुंबासाठी ते आदर्श बनले आहेत. ते स्वभावाने जिद्दी आणि आपल्या जीवन मूल्यावर टिकून राहणारे व्यक्ती आहेत. या प्रतिभावंत व्यक्तीने आपल्या आवडी-निवडीचे जीवनात नियम बनवले आहेत. कुटुंबाच्या इतर सदस्यांनीसुद्धा या नियमाचे पालन करावे, अशी त्यांची इच्छा असते. जणू काही त्याने जीवनाला रुग्णांसाठी लिहिलेल्या आपल्या ‘प्रिसक्रिप्शन’ (औषधपत्र) सारखे समजले आहे. हसण्याला सकाळच्या गोळीप्रमाणे आणि अश्रूंना संध्याकाळी रक्तदाबाच्या गोळीप्रमाणे घेतले जाऊ शकते का?

असो, शेक्सपियरचे नाटक ‘किंग लिअर’ प्रमाणे तो आपल्या मुलींमध्ये प्रेम आणि आदराचे आकलन करू पाहत आहे. संपूर्ण चित्रपटात किंग लिअर फक्त एक रूपक नव्हे तर सोहा त्या नाटकात महत्त्वाची भूमिकासुद्धा करत आहे. आईच्या मृत्यूनंतर इच्छा नसूनही ती कुटुंबाच्या आग्रहामुळे त्या नाटकात भाग घेते. जे चित्रपटाच्या नावाशी सार्थक आहे की, जीवन नेहमी सुरू असते.

डॉक्टर साहेबांच्या बालमित्राची भूमिका ओम पुरी यांनी केली आहे. ही भूमिका कथेच्या काठावर उभी नाही तर केंद्रबिंदूला प्रभावित करते. म्हणजेच तो क्रिकेटच्या अतिरिक्त खेळाडूपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. क्रिकेटमध्ये अतिरिक्त खेळाडूला फक्त क्षेत्ररक्षणाचा अधिकार असतो फलंदाजी करण्याचा नाही. मात्र या चित्रपटात हे पात्र कधी फलंदाजी करते तर कधी अंपायरची भूमिका पार पाडत असते. चित्रपटात शर्मिला अभिनीत पात्र आणि ओम पुरी अभिनीत पात्राचे नाते अपरिभाषेय आहे. गिरीश कर्नाड अभिनीत पात्र आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अनेक समस्यांना सामोरे जाते. तिचा दुरावा त्याला भावनांशी व्यावहारिक संतुलन शिकवून जाते. अंत्यसंस्कारापर्यंत तो अपल्या ‘प्रिसक्रिप्शन’मधून बाहेर येतो. एक चांगला माणूस, सगळ्यांविषयी चांगला विचार करणारा माणूस मृत्यूनंतरही जीवनाचा मार्ग प्रशस्त करतो. या वेळी शैलेंद्र यांच्या ओळी आठवतात -
‘किसी के आंसुओं में मुस्कराएंगे,
की मरके भी किसी को याद आएंगे’.