आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Female Celebrities Who Committed Suicide Like Jiah Khan

PHOTOS : या अभिनेत्रींनी आत्महत्या करुन संपवली आपली जीवनयात्रा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शोबिज, नाव, प्रसिद्धी आणि पैसा असे कॉकटेल आहे, जे एका रात्रीत जीवन बदलून टाकते. या मायानगरीत टिकून राहण्यासाठी संयम फार गरजेचा आहे. कलाकारांनी स्वतःचा तोल ढासळू दिला नाही, तर त्यांची सगळी स्वप्ने येथे पूर्ण होऊ शकतात. याची अनेक मुर्तीमंत उदाहरणं बॉलिवूडमध्ये बघायला मिळतात. अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्ये शुन्यातून विश्वाची निर्मिती केली आहे.
मात्र नाण्याची दुसरी बाजूही येथे बघायला मिळते. येथे असेही काही कलाकार आहेत, जे अल्पावधीत यशोशिखर गाठतात, मात्र तितक्याच जलद गतीने त्यांच्या करिअरचा ग्राफ खाली येतो. त्यानंतर हे कलाकार नैराश्येच्या दुनियेत स्वतःला झोकून देतात. काही कलाकार इतके डिप्रेशनमध्ये जातात की, मृत्यूला कवटाळणे ते पसंत करतात.
जिया खाननेही असेच केले. काम मिळत नसल्यामुळे ती नैराश्येने ग्रस्त होती. अखेर तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अद्याप तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र नैराश्य हे देखील तिच्या मृत्यूचे एक कारण असल्याचे समोर आले आहे.
तसे पाहता फिल्म इंडस्ट्रीत आत्महत्या करणा-या सेलिब्रिटींची यादी मोठी आहे.
स्लाईड शोच्या माध्यमातून एक नजर टाकुया त्या अभिनेत्रींवर ज्यांनी आत्महत्या करुन स्वतः आपली जीवनयात्रा संपवली...