आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीजनंतरसुद्धा प्रमोशनमध्ये बिझी आहेत 'हायवे'चे स्टार्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इम्तियाज अली दिग्दर्शित 'हायवे' हा सिनेमा 21 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणदीप हुड्डा मेन लीडमध्ये आहेत. हा सिनेमा रिलीज झाला आहे, मात्र रिलीजनंतरसुद्धा त्याची स्टारकास्ट सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात बिझी दिसत आहेत.
22 जानेवारीला सिनेमातील मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक इम्तियाज अली आणि वडील महेश भट्ट यांच्यासह मुंबईच्या एका मल्टिप्लेक्समध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. तिथे आलियाने आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसह फोटोग्राफर्सला भरपूर पोज दिल्या.
प्रमोशनवेळी दिग्दर्शक इम्तियाज आणि आलिया दोघेही खूप आनंदी दिसले. येथे आलियाने तिचे वडील महेश भट्ट यांच्यासह बराच वेळ एकत्र घालवला. यावेळी अभिनेत्री रिचा चड्ढासुद्धा हजर होती.
'हायवे' हा रोमँटिक ड्रामा असून ए. आर. रहमान यांनी सिनेमाला संगीतबद्ध केलंय. 'हायवे'ला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा प्रमोशनची खास छायाचित्रे...