आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FILMFAREमध्ये स्टार्सची मांदियाळी, जाणून घ्या कोण- कोण ठरले पुरस्कारांचे मानकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत शुक्रवारी अंधेरीतील यशराज स्टुडियोजच्या आवारात '59 वा आयडिया-फिल्मफेअर 2013' हा पुरस्कार सोहळा जल्लोषात पार पाडला. या सोहळ्यात बॉलिवूडकरांची मांदियाळी जमली होती. यावेळी बी टाऊनचे काही सेलिब्रिटी पुरस्कारांचे मानकरी ठरले तर काही सेलिब्रिटींनी आपल्या जलव्याने या सोहळ्यात जान आणली. सलमान खान, कतरिना कैफ, प्रियांका, माधुरी दीक्षित अशा ताऱ्यांनी सादर केलेल्या परफॉर्मन्समध्ये समस्त प्रेक्षकवर्ग हरखून गेला होता.
या अवॉर्ड सोहळ्याच्या सुत्रसंचालनाची धुरा रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्राने सांभाळली होती. यावेळी रणबीर आणि प्रियांका दोघेही रोबोच्या रुपात स्टेजवर अवतरले होते. पुढच्या 100 वर्षांचे भविष्य उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 'रोबो'च्या वेशात अवतरलेल्या रणबीरने नेहमीप्रमाणे आपल्या स्टाइलने सर्वांची मने जिंकली. प्रियांका चोप्रानेही त्याच्यासोबत रोबोच्या वेशात सूत्रसंचालन केले. रणबीरने थेट 2051 या वर्षातील बॉलिवूडचे संकल्पित चित्र रंगमंचावर उभे केले.
यावेळी 'आशिकी 2' मधील 'तुमही हो...' या गाण्यासाटी अरजित सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर 'लुटेरा' सिनेमातील 'सवार लूँ...' या गाण्यासाठी मोनाली ठाकूर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ठरली.
'आशिकी 2' साठी अंकित तिवारी, मिथुन, जीत गांगुली हे सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले. सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोरचा पुरस्कार 'काय पो छे' सिनेमासाठी हितेष सोनिकला मिळाला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आणखी कोणकोणते सेलिब्रिटी फिल्मफेअर पुरस्काराचे मानकरी ठरले आणि पाहा या अवॉर्ड नाइटची खास छायाचित्रे...