आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Filmfare Red Carpet: Priyanka Chopra, Deepika Padukone Go Black & Gold, Tanishaa Opts For Plunging Neckline

FILMFARE : \'59 व्या आयडिया-फिल्मफेअर\' पुरस्कार सोहळ्यात अवतरले बॉलिवूडचे ग्लॅमर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी सिनेसृष्टीतील मानबिंदू असलेला '59 वा आयडिया-फिल्मफेअर 2013' हा पुरस्कार सोहळा शुक्रवारी अंधेरीतील यशराज स्टुडियोजच्या आवारात जल्लोषात पार पाडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 'फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारा'ने गौरवण्यात आले.
या सोहळ्यात सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्राने. आपल्या खुमासदार शैलीत या दोघांनीही कार्यक्रमाची रंगत वाढवली. याशिवाय सुपरस्टार्सच्या जलव्याने या सोहळ्यात जान आणली. सलमान खान, कतरिना कैफ, प्रियांका, माधुरी दीक्षित अशा ताऱ्यांनी सादर केलेल्या परफॉर्मन्समध्ये समस्त प्रेक्षकवर्ग हरखून गेला होता.
या पुरस्कार सोहळ्याला समस्त बॉलिवूड अवतरलं होतं. करिश्मा कपूर, तुषार कपूर, काजोल, रणवीर सिंग, अनुपम खेर, प्रसून जोशी, शंकर महादेवन, सिद्दार्थ महादेवन, पंकज कपूर, सुप्रिया पाठक, रेमो डिसूझा, अनू मलिक, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, राकेश ओमप्रकाश मेहरा, रेखा, जावेद अख्तर, शबाना आझमी, सोहा अली खान, मनीष पॉल, ओम प्रकाश मेहरा, सलमान खान, माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, तनिशा, नील नितीन मुकेश, मनीष पॉल, धनुष, प्राची देसाई, कल्की कोचलीन, स्वरा भास्कर, नवाजउद्दीन सिद्दीकी यांसह बी टाऊनच्या अनेक स्टार्सनी आपल्या उपस्थितीने सोहळ्याला चारचाँद लावले. येत्या रविवारी म्हणजे 26 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता हा सोहळा सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा '59 व्या आयडिया-फिल्मफेअर 2013' या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या ग्लॅमरस सेलेब्सची खास झलक...