आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीच्या घराला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील घराला आग लागल्याचे वृत्त आहे. शिल्पा आणि राज कुंद्राच्या जुहूस्थित घराच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.
शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा सध्या लंडनमध्ये आहे. आगीविषयी त्यांना कळवण्यात आले आहे. बेडरुममधील एअर-कंडीशनरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या अंधेरीतील घराला आग लागली होती. त्यात त्यांची बेडरूम बेचिराख झाली होती. बेडरूममधील सर्व वस्तू, श्रीदेवीने बनविलेल्या पेंटीग्ज तसेच कपडे बेचिराख झाले होते.