आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Look: 'Mastaram' Team Ready With Posters, View Photos

First look: ‘मस्तराम’चे पोस्टर झाले रिलीज, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या 'मस्तराम' या आगामी सिनेमाच्या निर्मात्यांनी हळू-हळू सिनेमाला पुढे नेण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. कारण नुकतेच सिनेमाच्या पोस्टरसोबत सिनेमाचे स्टारकास्टसुध्दा ठरले आहेत. सिनेमाच्या पहिल्या पोस्टरची झलक समोर आली आहे.
'मस्तराम'ची कहाणी एका लेखकाच्या अश्लिल साहित्यावर आधारित आहे. या सिनेमात ताशा बेरी मुख्य भूमिका साकारणार आहे. तिने यापूर्वी 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये काम केले होते. सिनेमाचे दिग्दर्शन अखिलेश जैस्वाल करणार आहे.
'मस्तराम'च्या माध्यमातून अखिलेश दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदापर्ण करणार आहे. सिनेमाची मुख्य भूमिका साकारणारा कपिल दुबे आणि राहूल बग्गासुध्दा त्यांच्या करिअरची सुरूवात करणार आहेत.
राहूल बग्गाने सांगितले, 'मस्तरामच्या कहाणीमध्ये आपल्या चारित्र्याची कल्पना करावी लागते. हा खूप स्पष्ट सिनेमा आहे.' अजय जी राय आणि संजीवसिंह पाल या सिनेमाचे निर्माते आहेत. 1 मे 2014 रोजी सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे. सिनेमात यो यो हनीसिंहचा 'अचको मचको'चा रॅप ऐकायला मिळणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'मस्तराम' सिनेमाच्या पोस्टरची एक झलक...