आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगणा राणावत बनली 'रिवॉल्वर राणी', बघा FIRST LOOK

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगणा राणावत 'रिवॉल्वर राणी' या नवीन सिनेमाचा फस्ट लूक आज (6 मार्च) लाँच झाला आहे. हा सिनेमा ग्वालिअर आणि चंबलच्या पृष्ठभूमीवर आधारित आहे. सिनेमात कंगणा एक डॉन टाइप दबंग महिलेच्या भूमिकेत आहे.
साई कबीर श्रीवास्तवच्या दिग्दर्शनाखाली आणि राजू चढ्ढाच्या निर्मितीखाली बनवलेल्या या सिनेमात कंगणाच्या पात्राचे नाव अलका गुज्जर आहे. तिला फॅशन, मस्ती आणि बंदुकीची आवड असते. सिनेमात कंगणासोबत वीर दाससुध्दा मुख्य भूमिकेत आहे. तो एक फ्लर्टी तरूणाची भूमिका साकारणार आहे.
सिनेमात कंगणा दबंगिरी करताना दिसते आणि वीर दास तिला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. ट्रेलरनुसार, अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने भरपूर भरलेला हा सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'रिवॉल्वर राणी'मधील कंगणा आणि वीर दास यांची पहिली झलक...