हा आहे संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'रामलीला' 'या सिनेमाची फर्स्ट लूक. या सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'रामलीला' या सिनेमाची कहाणी शेक्सपिअरच्या क्लासिक रोमिओ आणि ज्युलिएटच्या लव्ह स्टोरीवर आधारित आहे. या सिनेमात रणवीर सिंग रोमिओच्या तर दीपिका ज्युलिएटच्या भूमिकेत आहे. या सिनेमातील रोमिओ गुजराती आहे.
सुरुवातीला ज्युलिएटच्या भूमिकेसाठी करीना कपूरचे नाव चर्चेत होते. मात्र नंतर संजय लीला भन्साळी यांनी ज्युलिएटच्या भूमिकेसाठी दीपिकाची निवड केली. यावर्षी 29 नोव्हेंबरला रोमिओ-ज्युलिएटची प्रेमकहाणी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा रामलीलाचा हा फर्स्ट लूक...