आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेट्स प्ले होली विथ सोनम अ‍ॅण्ड धनूष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्रात रंगात रंगलेले हे दोघे आहेत अभिनेत्री सोनम कपूर आणि साऊथ स्टार धनूष. आगामी 'रांझणा' या सिनेमाचा हा फर्स्ट लूक आहे. पोस्टरवर सोनम आणि धनूष होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. हे दोघे पहिल्यांदाच आपल्याला सेव्हेन्टी एमएमवर एकत्र दिसणार आहेत. आगामी 'रांझणा' या सिनेमात सोनम आणि धनूषची ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

होळीचे औचित्य साधत 'रांझणा'चा हा फर्स्ट लूक नुकताच रिव्हील करण्यात आला. हा रोमॅण्टिक धाटणीचा सिनेमा असून आनंद राय यांनी हा दिग्दर्शित केला आहे.

सोनम आणि धनूषबरोबर या सिनेमात अभय देओल, स्वरा भास्कर, दीपक दोब्रियाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
हा सिनेमा 28 जून 2013 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'रांझणा'च्या शुटिंगदरम्यानची काही खास छायाचित्रे...